हाथरस बलात्कार प्रकरणाच्या चौकशीला मुदतवाढ

0

लखनऊ : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली होती. एसआयटी तपास करत असून चौकशीसाठी पुन्हा दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष तपास पथकाला (एसआयटी) सुरुवातील सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. ती पुन्हा वाढविण्यात आली आहे. आज बुधवारी ७ ऑक्टोंबर रोजी एसआयटी आपला अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपावणार होती. मात्र, एसआयटीच्या पथकाने तपासासाठी आणखी दहा दिवसांची मुदतवाढ मागितली होती, याला सरकारने मान्यता दिली आहे. गृहसचिव भगवान स्वरुप यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचा तपास सुरु आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्‍यीय एसआयटीची स्थापना केली. तसेच, या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरात लवकर शिक्षा देण्याचे निर्देशही दिले आहेत.

गृहसचिव भगवान स्वरुप यांच्या नेतृत्त्वात तयार करण्यात आलेल्या एसआयटीममध्ये चंद्र प्रकाश आणि एसपी पूनम यांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, एसआयटीने आपल्या तपासादरम्यान पीडित कुटुंब, आरोपी, पोलीस प्रशासनासह 100 पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत.