आरोग्य मंत्री सावंत यांच्या जावयाला अटक

सोलापूर | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे थोरले बंधू कालिदास सावंत यांच्या जावयावर ट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जयसिंह चक्रपाणी (रा. अनगर, ता मोहोळ,जि. सोलापूर) असे कालिदास सावंत यांच्या जावयाचे नाव असून त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रथमेश जयसिंह गुंड, जयवंत महादेव थिटे, अक्षय राजेंद्र कारमकर इतर गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तानाजी सावंताच्या थोरल्या भावाची मुलगी अनगर येथे दिली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे आहेत.