अयोध्याप्रश्नी आठ दिवसात अहवाल देण्याचे आदेश !

0

नवी दिल्ली: अयोध्या येथील राम जन्मभूमी, बाबरी मशीद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीला येत्या आठ दिवसात आपला प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मध्यस्ती करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने आपल्या कामात फारसी प्रगती केली नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात आर्टऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता.

८ मार्च रोजी गठीत केलेल्या समितीमध्ये श्री श्री रविशंकर आणि इतर सदस्य नियुक्त केले आहेत. समितीने १५ ऑगस्ट पर्यंत तोडगा काढण्याचा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. या समितीने आपल्या कामात फारसी प्रगती झाला नसल्याचा दावा हिंदू पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.