नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी आरोपींवर सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी करण्यास स्थगिती दिली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय घेतला होता. मुस्लीम समाजातील भटक्या आदिवासी जमातीतील ८ वर्षाच्या मुलीचे जानेवारी २०१८ ला अपहरण करून तिला अंमली पदार्थ देण्यात आले. तसेच तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.