राज्यासह देशभरात उन्हाचा तडाखा वाढणार, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : देशामध्ये वाढत असलेल्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच पुढील दोन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. देशातील अनेक राज्यात तापमान ४५ अंशावर गेले आहे. आज देशातील अनेक राज्यात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.

हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअल आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअर राहण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये देखील तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. तसेच जोधपूर, बिकानेरमध्ये तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रे प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये तापमान ४२ अंशपार जाण्याची शक्यता आहे. तसेच अरूणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मझोरम आणि त्रिपूरामधील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.