नांदुरा येथे भाजपाची संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक खासदार रक्षाताई खडसे व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांच्या उपस्थितीत संपन्न
भुसावळ प्रतिनिधी l
आगामी निवडणुकांना लक्षात घेऊन बुथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत बुथ रचना मजबूत करण्याच्या दुष्टीने रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा ची संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक आज नांदुरा येथे खासदार रक्षाताई खडसे व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.
सदर बैठकीत खासदार रक्षाताई खडसे व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.चैनसुख संचेती यांनी उपस्थित भाजपा नांदुरा तालुका प्रमुख पदाधिकारी व बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांना बुथ सशक्तीकरण तसेच केंद्र व राज्य स्तरावरून पक्षामार्फत आलेल्या विविध आगामी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करून माहिती दिली. यावेळी महा जनसंपर्क अभियान बद्दल माहिती देऊन, केंद्र सरकारच्या योजनाच्या लाभ घेतलेल्या लाभार्थ्याशी संपर्क करणे बाबत सांगितले, तसेच उपस्थित भाजयुमो पदाधिकाऱ्यांकडून त्यांना येणाऱ्या स्थानिक समस्या व अडचणी जाणून घेऊन, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांच्यासह मोहनजी शर्मा, बलदेवराव चोपडे, अरुण पांडव, जगन डांगे, दत्ता सुपे, मिलिंद डवले, सुधिर मुर्हेकर, शंकरराव पाटील, डॉ योगेश पटणी, गणेश भोपळे, उमेश ताकवले, अरविंद किनगे, नितीन लाहाने ई. उपस्थित होते.