मुंबई: आरे मेट्रो कारशेड प्रकरणी वृक्षतोडीविरोधातील याचिका काल शुक्रवारी हायकोर्टाने फेटाळली. त्यामुळे वृक्षतोडीचा मार्ग मोकळा झाला. मात्र याला पर्यावरण प्रेमींचा प्रचंड विरोध होता. दरम्यान कोर्टांच्या निर्णयानंतर काल रात्रभर वृक्ष तोडण्यात आली. रात्रीतून जवळपास ४०० पेक्षा अधिक झाडे कापण्यात आले आहे. यावरून आता बॉलीवूड सेलिब्रेटींनी देखील संताप व्यक्त केला आहे. बॉलीवूड कलाकारांनी सोशल मीडियातून आपला राग व्यक्त केला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर, दिया मिर्झा, फरहान अख्तर, ऊर्मिला मातोडकर, रिचा चढ्ढा यांच्यासह अनेक कलावतांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला आहे.
अनेक बॉलीवूड कलाकारांनी रात्री आरेतील कत्तल करण्यात आलेल्या झाडांचे फोटो शेअर करत या कृत्याचा निषेध केला आहे. सरकारकडून चुकीचा निर्णय घेण्यात आल्याचे आरोप होत आहे. या निर्णयाचा विपरीत परिणाम भविष्यात होणार असल्याचे बॉलीवूड कलाकारांनी म्हटले आहे.