हायकोर्टाकडून लग्न रद्द

0

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने नऊ वर्षांपूर्वी झालेले लग्न रद्द केले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरचे रहिवासी असलेले पती-पत्नीची लग्नाच्या दिवसापासूनच कायदेशीर लढाई सुरु होती. पतीने फसवणुकीने कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतल्याचा दावा महिलेने केला आहे. त्यामुळे हे लग्न रद्द करावं, अशी मागणी महिलेने केली होती. तर पतीने ह्याला विरोध केला होता.

असे आहे प्रकरण
हे प्रकरण 2009 मधील आहे. त्यावेळी महिलेचं वय 21 तर तिच्या पतीचं वय 24 वर्ष होतं. महिलेच्या आरोपानुसार, पतीने फसवणूक करुन कोऱ्या कागदावर तिची स्वाक्षरी घेतली. यानंतर महिलेला रजिस्ट्रारकडे नेण्यात आलं. तरीही तिला समजलं नाही की, ती लग्नाची कागदपत्रं होती. पण जेव्हा तिला संपूर्ण प्रकरण कळलं तेव्हा याचिका दाखल करुन लग्न रद्द करण्याची मागणी तिने केली.