सोलन: हिमाचल प्रदेशातील सोलनमधील कुमारहट्टी-नाहन महामार्गाशेजारी असलेल्या सेहज ढाबा आणि गेस्ट हाऊसची इमारत कोसळली आहे. इमारतीच्या मलब्याखील अनेकजण दबल्या गेले असून, यामध्ये भारतीय सेनेचेही ३० ते ३५ जवान दबल्या गेले असल्याचे बोलले जात आहे. मलब्याखाली दबलेल्यांपैकी आतापर्यंत दहा जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे.
हे जवान बसद्वारे जात असताना या ठिकाणी जेवणासाठी थांबले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने धाव घेतली आहे. या ठिकाणी सध्या तुफान पाऊस सुरू असल्याने स्थानिक लोकांनी देखील बचाव कार्यात पुढाकार घेतला आहे.