हिमेश रेशमिया दुसऱ्यांदा अडकला लग्नबेडीत

0

मुंबई- सध्या बॉलीवुडमध्ये लग्नाचे ज्वर वाढले असल्याचे दिसून येते. सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांचे लग्न चार दिवसापूर्वी झाले. त्यानंतर नेहा धुपिया आणि अंगद बेदी हे विवाह बंधनात अडकले. त्यानंतर आता हिमेश रेशमिया यांनी प्रेमिका सोनिया कपूरशी विवाह केला. जवळच्या मित्र आणि कुटुंबांच्या उपस्थितीत मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी हा विवाह सोहळा पार पडला. लवकरच हिमेश एक भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहे.

हिमेशने यापूर्वी कमल याच्याशी विवाह केला होता. या दोघांनी २०१६  मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि गेल्या वर्षी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने अधिकृतपणे त्यांना घटस्फोट दिला होता.