नवी दिल्ली-वाढती लोकसंख्या ही देशासमोरील मोठे संकट आहे. सरकार लोकसंख्या कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. मात्र सत्ताधारी भाजपच्याच एका वादग्रस्त आमदाराने पुन्हा एक वादग्रस्त विधान केले आहे. वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण करणारे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘हिंदुत्व अखंड ठेवायचं असेल तर हिंदू दांपत्यांनी किमान पाच मुलांना जन्म दिला पाहिजे’, असे म्हटले आहे.
‘प्रत्येक अध्यात्मिक गुरुची इच्छा आहे की, प्रत्येक हिंदू दांपत्याने किमान पाच मुलांना जन्म द्यावा. यामुळे हिंदूंची लोकसंख्या नियंत्रित राहिल आणि हिंदुत्वही अखंड राहील’, असे सुरेंद्र सिंह बोलले आहेत.