ऐतिहासिक: राज्यसभा खासदारांचे लोकसभेत जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार

0

नवी दिल्ली: आज सोमवार १४ सप्टेंबरपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या खबरदारीसह हे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाची नियमावली जाहीर केली. इतिहासात कधीही घडल्या नाही अशा बाबी यावेळी संसदेच्या अधिवेशनात घडणार आहे. संसदेत बोलतांना सदस्यांना उभे राहूनच बोलवे लागते. मात्र यावेळी प्रथमच सदस्यांना खाली बसूनच बोलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संसदेच्या इतिहासात कधीही घडले नाही अशी एक मोठी गोष्ट यंदाच्या अधिवेशनात घडले आहे. राज्यसभा सदस्यांनाही लोकसभा सभागृहात बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला त्याला सर्व सदस्यांनी संमती दिली.

अनेकांचे लोकसभेत जाण्याचे स्वप्न असते. लोकसभेत पराभव झाल्यानंतर अनेकांना राज्यसभेत संधी दिली जाते. त्यामुळे लोकसभेत जाण्याचे अनेकांचे स्वप्न अपूर्ण राहून जातात, मात्र यावेळी राज्यसभा खासदारांनाही लोकसभा सभागृहात बसता येणार आहे. त्यातून एक स्वप्नपूर्ती देखील होणार आहे.

कोरोनामुळे सभागृहाचे कामकाज दिवसातून केवळ चार तासच सुरु राहणार आहे.