VIDEO…ऐतिहासिक घटना; अखेर शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश !

0

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले आहे. मात्र त्यानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. यासाठी आंदोलने दोन्ही बाजूने आंदोलने सुरु होती. अखेर आज सकाळी शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केला आहे. आज सकाळी ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या २० महिलांनी मंदिरात प्रवेश करुन इतिहास रचला आहे. बिंदु आणि कनकदुर्गा अशी या दोन महिलांची नावे आहेत. केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथे महिलांना प्रवेश देण्यात आला.

शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यावरून निर्माण झालेला वाद अद्यापही सुरूच आहे. यावरुन तेथील स्थानिकांनी आणि मंदिरातील पुजाऱ्यांनी महिला प्रवेशाला विरोध केला आहे. आज पहाटे ३.४५ वाजता दोन महिलांना आयप्पा मंदिरात प्रवेश केला. मध्यरात्री मंदिराच्या पायऱ्या चढण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यावेळी, या दोन महिलांसमवेत काही पोलीस गणवेशात होते, तर काही पोलीस कर्मचारी सिव्हील ड्रेसमध्ये सुरक्षा पुरवत होते.

मुख्यमंत्री पिनराई विजयनन यांनी महिलांना सर्व प्रकारची सुविधा देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.