चाळीसगाव- शहर पोलीसांनी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ३१ सायकली हस्तगत केल्या आहेत. चाळीसगाव तालुक्यातील कजगाव परिसरातून सायकली हस्तगत करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, पोउनि राजेश घोळवे, हवालदार बापूराव भोसले, पोकॉ हितेश चिंचोरे, संदीप भोई, गोवर्धन बोरसे, तुकाराम चव्हाण, गोपाल बेलदार, प्रेमसींग राठोड, राहुल गुंजाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.