हॉलिवुड अभिनेता इसाक कॅपीची आत्महत्या

0

नवी दिल्ली : हॉलिवुड अभिनेता इसाक कॅपी याने आत्महत्या केली आहे. इसाकने मार्वल स्टूडियोजच्या २०११ मध्ये आलेल्या ‘थॉर’ चित्रपटात अभिनय केला आहे. एरिजोनातील सार्वजनिक सुरक्षा विभागाने त्याच्या निधनाची माहिती दिली. तो ४२ वर्षांचा होता. इसाक कॅपीने एरिजोनातील फ्लॅगस्टाफजवळ असलेल्या एका पुलावरून उडी मारुन आत्महत्या केली.

कॅपीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या सोशल मीडिया इन्स्टाग्रामवरुन एक भावनिक पोस्ट शेअर केली. ‘मी नेहमी हाच विचार करायचो की मी चांगला माणूस आहे. परंतु मी एक चांगला माणूस बनू शकलो नाही. संपूर्ण आयुष्यभर मी वाईट माणूसच राहीलो. मी अनेक लोकांना धोका दिला. ड्रग्स चोरले. माझ्या शरीरालाही नुकसाक पोहचवले. मला माझ्या या वागण्याबाबत शरम वाटते आहे आणि याबाबत मी लोकांना नेहमी समजावत आलो आहे’ मृत्यूपूर्वी अशाप्रकारची भावनिक पोस्ट लिहली आहे.

इसाकने त्याच्या पोस्टमध्ये अमेरिकी राष्ट्रपाती डोनाल्ट ट्रम्प यांचीही माफी मागितली आहे. ट्रम्प, जीसस क्राइस्टसह ज्यांची मने दुखावली आहेत त्या सगळ्यांची माफी त्याने शेवटच्या पोस्टमधून माफी मागितली आहे. इसाक कॅपीने अनेक चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत. २०११ मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर ‘थोर’मध्ये त्याने भूमिका साकारली होती. त्याशिवाय २००९ मध्ये आलेल्या ‘टर्मिनेटर साल्वेशन’ आणि ‘फॅनबॉइज’मध्येही त्याने काम केलं आहे. इसाकच्या या भावनिक पोस्टने आणि त्याच्या जाण्याने अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.