पारोळा :- येथील प्रमाणिक, कर्तव्य जपणारे पोलीस छत्रपती ग्रृह रक्षक संघर्ष समिती शौर्य पुरस्कार अश्या अनेक पुरस्काराने सन्मानित असलेले ग्रृह रक्षक दलाचे जवान प्रभाकर विश्वनाथ पाटील यांनी कोरोना सारख्या अत्यंत कठीण अशा कर्दनकाळात परिवाराची स्वतःची जिवाची पर्वा न करता दिवस रात्र जनसेवा दिली. या विषयी पारोळा नगर परिषदेने दखल घेत, कोरोना योध्दा पुरस्काराने ग्रृह रक्षक दलाचे जवान प्रभाकर पाटील यांना सन्मानचिन्ह देत सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या अती भयानक काळात आया, बहिणी व नागरिकांना धिर देत त्यांना कोरोना होण्यापासून रोखून तश्या सुचनाही दिल्यात त्यांच्या या सेवेबद्दल पारोळा नगरपरिषदेने दखल घेत. त्यांना कोरोना योध्दा सारख्या पुरस्काराने खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्ष करण पवार, यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान, कार्यकर्त उपस्थित होते. प्रभाकर पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल, पोलीस दलाकडून, ग्रृह रक्षक दलाकडून, पिरनकुमार अनुष्ठान, विजय पाटील, प्रविण पाटील सर, दौलतनाना पाटील, गणेश बिचवे, व दक्ष पोलीस टाइम्स परिवारानेही त्यांचे अभिनंदन केले.