जम्मू-काश्मीरातील ग्रामप्रमुखांसोबत अमित शहांची चर्चा !

0

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर राज्याला लागू असलेला स्वतंत्र राज्याचा दर्जा कलम ३७० रद्द करून काढून घेण्यात आला आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीरातील परिस्थिती थोडीशी बिकट बनली होती. हळूहळू आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. केंद्र सरकार आणि गृहमंत्रालय जम्मू-काश्मीरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज जम्मू-काश्मीरातील विविध गावांच्या ग्राम प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी जम्मू-काश्मीरातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तेथील परिस्थितीसाठी काय करता येईल याबाबत चर्चा झाली.

गृहमंत्रालयात ही बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, गृहराज्य मंत्री नित्यानंद रॉय उपस्थित होते.