जळगाव l जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळ व जळगाव जिल्यातील अठ्ठावीस लेवा समाज मंडळे यांचे संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान येत्या २३ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
जळगाव शहरातील सरदार लेवा भवन ,टेलिफोन ऑफीसजवळ येथे उल्लेखनीय समाजकार्य करणारे समाज कार्यकर्ते यांचा जाहीर सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला सकाळी ९ वाजता प्रारंभ होईल.
कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक माजी आमदार नीलकंठ फालक यांच्या अध्यक्षतेखाली सरदार पटेल लेवा भवनात सायंकाळी घेण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा लेवा पाटीदार मंडळाचे अध्यक्ष लीलाधर चौधरी ,उद्योजक अरुण बोरोले ,डॉ.मिलिंद पाटील ,कलावंत तुषार वाघुळदे ,ऍड.पुरुषोत्तम नेमाडे ,विनोद हरी पाटील ,गजानन भोळे , रविंद्र फिरके ,प्रकाश वराडे ,महेंद्र ज्ञानदेव पाटील ,नितीन वसंत इंगळे यांच्यासह प्रा.डॉ.सुनीता चौधरी , ऍड.ज्योती भोळे,ज्योती महाजन ,ऍड. भारती ढाके ,संगीता योगेंद्र पाटील ,नीता वराडे,सीमा गाजरे आदी उपस्थित होते. अनेक कार्यकर्त्यांवर कार्यक्रमाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वाढते घटस्फोट ,प्रि-वेडिंग शूट तसेच समाजातील विविध ज्वलंत प्रश्न, समस्या यावर गांभीर्याने भाष्य केले जाणार आहे अशी माहिती आयोजन समितीचे अरुण बोरोले , ऍड.पुरुषोत्तम नेमाडे यांनी दिली. चर्चेत लीलाधर चौधरी ,तुषार वाघुळदे ,डॉ.मिलिंद पाटील , ऍड.भारती ढाके यांनी सहभाग घेतला.