कल्याण (प्रतिनिधी):पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार समितीच्या वतीने वर्धापन दिनाचे अवचित्य साधत राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे ,सचिव डॉ. वैभव पाटील यांच्यासह इतर सदस्य व पदाधिकारी तसेच महिला उत्कर्ष समिती यांच्या उत्कृष्ट नियोजनाने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झालेल्या या सोहळ्यास मराठी मुद्रण परिषद महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, माननीय व्ही एस म्हात्रे निवृत्त सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ,माननीय बाळासाहेब पाटील माजी राज्यमंत्री माननीय म्हाडा अध्यक्ष व सुप्रसिद्ध गायक दादुस यांच्या उपस्थितीत श्री गणेशाचे पूजन करून दिपप्रज्वलाने सोहळ्याची सुरुवात करण्यात आली यावेळी विविध राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र, पत्रकार क्षेत्र, शेतीक्षेत्र, आरोग्य क्षेत्र, सामाजिक क्षेत्र यांचा समावेश होता यावेळी सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल श्री सुनील इंगळे यांचा शाल व सन्मानचिन्ह अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे व सुप्रसिद्ध गायक आणि बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादुस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले याबद्दल समाजातील विविध मान्यवरांनी त्यांना त्यांचे अभिनंदन करून भविष्यातील कारकिर्दी बद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.