धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांचा सन्मान 

न्हावी प्रतिनिधी l

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कडून महाविद्यालयांना ऑनलाइन तीन वर्षाची माहिती मागितलेली होती. विद्यापीठाने त्यांचे मूल्यांकन करून धनाजी नाना महाविद्यालयाला अ श्रेणी देण्यात आली. त्यानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी आर चौधरी व त्यांचे सर्व सहकारी उपप्राचार्य डॉ उदय जगताप, उपप्रचार्य डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य विलास बोरोले, उपप्राचार्य डी बी तायडे, उपप्राचार्य एस व्ही जाधव, राजेंद्र तायडे यांचा व्हॉइस ऑफ मीडिया यावल तालुका तर्फे शाल,हार, बुके देऊन सन्मान करण्यात आला. प्रथम व्हाईस ऑफ मीडियाचे यावल तालुका अध्यक्ष ललितकुमार फिरके यांनी प्राचार्य डॉक्टर बी आर चौधरी यांना शॉल पुष्पहार व बुके देऊन सत्कार केला. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद टोके, यावल तालुका उपाध्यक्ष समीर तडवी, संदीप चौधरी उपस्थित होते.

अकॅडमी ऑडिटमध्ये अ श्रेणी प्राप्त झाले त्याचे श्रेय माझे एकट्याचे नसून तापी परिसर विद्या मंडळाचे व्यवस्थापन मंडळ व सर्व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनीचे आहे. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीषदादा चौधरी व व्यवस्थापन मंडळातील सर्व पदाधिकारी यांनी जे निर्णय स्वातंत्र्य दिले त्यामुळे सुद्धा अनेक कामे लवकर मार्गी लावता आली. या दोन्ही गोष्टींमुळे अ दर्जा प्राप्त करणे शक्य झाले असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी आर चौधरी यांनी सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नंदकिशोर अग्रवाल यांनी केले.