एक रूपयाचा इन्कम नसताना ठाकरे आलिशान आयुष्य कसं जगतात? नितेश राणेंचे ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई : बीडमध्ये ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. ठाकरे गटाचे नेते गणेश वरेकर आणि जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांच्यात वाद झाला. यानंतर आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुषमा अंधारेंनी दोन चापट्या लगावल्या असल्याचं आप्पासाहेब जाधव म्हणाले. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नितेश राणे म्हणाले की, सुषमा ताई आमच्या कितीही देवी देवतांवर बोलल्या, आमच्यावर कितीही आरोप केले तरी त्यांना झालेल्या मारहाणीचं आम्ही समर्थन करत नाही. पण त्यांच्यावर झालेले आरोप आमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. जिल्हाप्रमुख पद विकायला काढलं होतं. ऑफिसच्या सोफा आणि एसीसाठी पैसे मागत होत्या. हे आरोप महाराष्ट्राने विचार करण्यासारखे आहेत.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हाही त्यांनी हाच आरोप केला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनीही तेच सांगितलं की संघटनेतील पदे विकली जात आहेत. तिकिटे विकली जातात. आताही तोच आरोप होतोय. वारंवार तोच आरोप होत असेल तर त्या आरोपांमध्ये तथ्य आहे, असं नितेश राणे म्हणाले.

महाप्रबोधन यात्रेत मला त्यांच्याकडून दुसरी काही अपेक्षाच नाही. कारण जसा पक्षप्रमुख तसे त्याचे कार्यकर्ते. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यात हेच केलं. काय वेगळं केलं? एक रूपयाचेही इन्कम नसताना ते आलिशान आयुष्य कसं जगतात? एसी कोणत्या कंपनीचे लागले. व्हिडीओकॉन कंपनीचे मालक कोणाचे खासदार होते? कपडे धुवायला लीली मध्ये जातात. तिथे त्यांची भारतीय कामगार सेना आहे. यांच्या गाड्या पटेल नावाच्या व्यक्तीकडे जातात. परदेश दौऱ्यावर एक रूपयाही उद्धवजिंच्या खिशातून जात नाहीत. सुष्माजी अजून वेगळं काय करणार, संजय राऊत अजून वेगळं काय करणार? महाराष्ट्राला दरोडेखोर म्हणून लुटतात. मग दुसऱ्यांवर काय आरोप करतात?, असंही नितेश राणे म्हणाले.