भाजपची मुस्लिमांबद्दल बेगडी आपुलकी?: ओवेसी

0

नवी दिल्ली: गरीबांप्रमाणेच अल्पसंख्यांकाचाही छळ झाला. अल्पसंख्यांकांमध्ये भाजपबद्दल एक काल्पनिक भय निर्माण करुन त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. मतपेटीच्या राजकारणासाठी त्यांचा वापर झाला. मुस्लीमांचा विश्वास मिळवणे हेच आता लक्ष्य आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हटले होते. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर एमआयएमचे अध्यक्ष असुउद्दिन ओवेसी यांनी टीका केली आहे. मोदींनी यांनी मुस्लीम समुदायातील किती लोकांना उमेदवारी दिली? असा प्रश्न उपस्थित करत भाजप हे विरोधाभासी आणि संभ्रम निर्माण करण्याचे राजकारण करत असल्याचे आरोप केले.

भाजपने ढोंगी असून गेल्या पाच वर्षापासून त्यांनी मुस्लीम समुदायाबद्दल असेच संभ्रम निर्माण केल्याचे आरोप ओवेसी यांनी केले.