नवी दिल्ली: दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेता हृतिक रोशनने भारतातच नव्हे तर जगभरात चाहत्यांच्या मनावर जादू केली आहे. त्यामुळेच हृतिकने ऑगस्ट २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टॉप ५ मोस्ट हॅन्डसम मेन इन द वर्ल्ड’च्या यादीमध्ये नाव कमावले आहे. ही यादी अमेरिकेतील एका कंपनीने प्रदर्शित केली आहे. या यादीमध्ये जगातील सर्वात हॅन्डसम आणि गूड लूकींक मेन्सचा समावेश आहे. भारतीय अभिनेता हृतिक रोशनने या यादीमध्ये पहिले स्थान पटकावले असून अभिनेता क्रिस इव्हान्स, अभिनेता डेव्हिड बेकहॅम, अभिनेता रॉबर्ट पॅटीन्सन आणि अभिनेता उमर बोरकान अल गाला यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. .
नुकताच हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर चांगली कमाई केली. विकास बहल यांनी ‘सुपर ३०’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ३० मुलांना एकत्र आणून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी गणितज्ञ आनंद कुमार यांचे प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट आनंद कुमार यांनी गरीब मुलांना शिकवण्यासाठी घेतलेल्या कष्टांची आणि मेहनतीची कथा आहे.