मुंबई – आज सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा देशभरातून ३ हजार ५०३ केंद्रांवर घेण्यात आलेल्या सीबीएसई बारावीच्या परीक्षेला १० लाख ९८ हजार ४२० विद्यार्थी बसले होते.
कोणत्या वेबसाईट्सवर रिझल्ट पाहाल?
रिझल्ट कसा पाहाल?
- वेबसाईट ओपन करा.
- त्यानंतर ‘CBSE 12th Result 2017’ या लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा.
- ‘सबमिट’वर क्लिक करा.
- त्यानंतर रिझल्ट ओपन होईल.
दरम्यान, आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी ३ वाजता जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. सोमवारी निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलंय. यंदा राज्यातल्या नऊ विभागातून ८ लाख ४८ हजार ९३९ विद्यार्थी तर ६ लाख ७५ हजार ४३६ विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली होती.