मी एनडीएमध्येच आहे आणि राहणार : नारायण राणे

0

नवी दिल्ली: देशात लागलेल्या लोकसभा निवडणुक निकालानंतर राजकीय घडामोडी वेगवान होत असून, राज्यात कॉंग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे हे पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षात येणार असल्याची चर्चा रंगत असताना, नारायण राणे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मी एनडीएमध्येच आहे आणि राहणार अशी घोषणा करून या पक्ष बदलाबाबतीत होणाऱ्या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे.

मी कॉंग्रेस पक्षात जाणार आहे अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. पक्षबदली बाबत माझ्याशी कुणीही संपर्क साधला नसून तसा कुठला प्रस्ताव माझ्याकडे आला नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. कॉंग्रेस प्रवेशाची चर्चा कुठून सुरु झाली आहे, हे मला माहित नाही. 

कॉंग्रेस पक्षात प्रवेशाचा प्रश्नच येत नाही असे ते या वेळी म्हणाले एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत आले असताना आज त्यांनी महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.