अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास इच्छुक-तुळशी गबार्ड

0

न्युयोर्क-अमेरिकन संसदेतील पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड यांनी २०२० मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडीबाबत आपण गंभीरपणे विचार करत असल्याचे सांगितले आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या गबार्ड सदस्य आहेत. माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी याबाबत खुलासा केला.

देशातील प्रश्नांबाबत मी गंभीर असून त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचे गबार्ड यांनी सांगितले. नोव्हेंबर २०२० मध्ये निवडणुका होणार आहे.