मी अधिककाळ अध्यक्षपदावर राहणार नाही: राहुल गांधी

0

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नसला तरी ते राजीनाम्यावर ठाम आहे. आज पुन्हा त्यांनी राजीनाम्यावर आपण ठाम असल्याचे बोलून दाखविले आहे. मी अधिककाळ कॉंग्रेस अध्यक्ष पदावर राहणार नाही, पक्षाने दुसरा पर्याय शोधावा असे राहुल गांधींनी पुन्हा पक्षाला सुचविले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेत्यांकडून राहुल गांधींची मनधरणी केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे पाच मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला गेले होते, त्यांनी राहुल गांधींनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी विनंती देखील केली होती. पाचही मुख्यमंत्री राजीनामा देणार असल्याची चर्चा देखील सुरु आहे.