थेरेसा मे २०२२ ची निवडणूक लढविणार नाही

0

लंडन- ब्रेग्झिट समझोत्यावरून हुजूर पक्षाच्या सदस्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याविरोधामध्ये अविश्वासाचा ठराव मांडला होता. याच मुद्द्यावरून अडचणीत आलेल्या थेरेसा मे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे त्यांना किमान वर्षभर दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये होणार असून त्या वेळी आपण पक्षाचे नेतृत्व करणार नाही अशी घोषणा थेरेसा मे यांनी केली आहे.

ब्रेग्झिट करारावरून मांडण्यात आलेला अविश्वास ठराव फेटाळण्यासाठी थेरेसा मे यांना पक्षाच्या ३१५ पैकी १५८ खासदारांची मते मिळणे आवश्यक होते. गुप्त मतदानात हुजूर पक्षाच्या ३१७ मतांपैकी २०० मते मे यांच्या बाजूने पडली तर ११७ मते त्यांच्या विरोधात गेली. टक्केवारीत सांगायचे तर मे यांना स्वपक्षीय ६३ टक्के खासदारांचा पाठिंबा आहे.