VIDEO…नेहरूंचा हा विचार मला खूप आवडतो-नितीन गडकरी

0

नवी दिल्ली- सध्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आपल्या विविध विधानांमुळे माध्यमात चर्चेत आहे. दरम्यान त्यांनी आता देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणाचे कौतुक केले आहे. नेहरू नेहमी ‘इंडिया ईज नॉट अ नेशन, ईट ईज अ पॉप्यूलेशन’ असे म्हणायचे, त्यांचे हे भाषण मला खूप आवडते असे गौरोद्गार नितीन गडकरी यांनी काढले आहे. एका कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी आपले मत व्यक्त केले.

या देशाचा प्रत्येक व्यक्ती देशासाठी प्रश्न आहे, समस्या आहे. त्यांचे हे भाषण मला खूपच आवडते. त्यांमुळे मी एवढे जरुर करु शकतो की, देशासमोर मी समस्या बनून राहणार नाही.

प्रत्येकाने दुसऱ्याकडे बोट दाखविण्यापेक्षा स्वत:काही करता येईल का? याचा विचार केल्यास देशातील ‘सिस्टम’ बदलायला फार वेळ लागणार नाही असे देखील यावेळी गडकरी यांनी सांगितले.