माझा निवृत्तीचा निर्णय चुकला, पुन्हा खेळण्याची संधी द्या: अंबाती रायडू

0

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अंबाती रायडू याने काही दिवसांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र आता त्याला निवृत्तीच्या निर्णयाचा पश्चताप होतांना दिसत आहे. कारण खुद्द अंबाती रायडू याने हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून मी घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यात येऊन मला पुन्हा खेळण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे. मी भावनिक होऊन घाईघाईत निवृत्तीचा निर्णय घेतला होता असे रायडू यांनी म्हटले आहे.

चेन्नई सुपर किंग्स संघ आणि व्हीव्हीएस लक्ष्मण, नोएल डेव्हिड यांनी मला निवृत्तीचा निर्णय चुकल्याचे जाणीव करून देत मला कठीण परिस्थितीत खूप सहकार्य केले असे म्हणत रायडू यांनी निवृत्तीच्या निर्णयावर पश्चताप व्यक्त केला आहे.