आयसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय; वर्ल्डकपमध्ये प्रत्येक संघासोबत असणार अ‍ॅटी करप्शन अधिकारी

0

नवी दिल्ली: इंग्लंडमध्ये होत असलेल्या वर्ल्डकपसाठी आयसीसीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वर्ल्डकप अधिक पारदर्शक व्हावे यासाठी प्रत्येक टीमसोबत आयसीसीकडून एक अ‍ॅटी करप्शन अधिकारी नेमण्यात येणार आहे. प्रत्येक टीमला एक स्वतंत्र अ‍ॅटी करप्शन अधिकारी देण्यात येणार आहे. अ‍ॅटी करप्शन अधिकारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आजवर विश्वचषक सामना होत असलेल्या शहरात एकेक अ‍ॅटी करप्शन अधिकारी नियुक्त केले जात होते. प्रत्येक संघावर नजर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सराव सामन्यापासून तर अखेरच्या सामन्यापर्यंत हे अधिकारी संघासोबत असणार आहे.