सलामीच्या सामन्यात इंग्लंडचे आफ्रिकेला त्रिशतकी आव्हान

0

लंडन: क्रिकेटच्या महासंग्रामाला अर्थात आयसीसी वर्ल्ड कप 2019 ला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना क्रिकेट हा खेळ विश्वाला ज्यांनी शिकवला तो इंग्लंडचा संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये हा सामना रंगला. पहिला सामना अशा दोन संघांमध्ये झाला, ज्यांनी आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेकडे ३१२ धावांचे लक्ष्य ठेवले. बेन स्टोकने इंग्लडतर्फे सर्वाधिक ८९ (७९ चेंडू) धावा केले. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी गिडी याने दमदार फलंदाजी केली. त्याने १० षटकात ६६ धावा देत 3 गडी बाद केले.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यांमध्ये आतापर्यंत 59 सामने खेळवले गेले आहेत. यापैकी 29 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत, तर इंग्लंडला 26 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहेत. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक सामना बरोबरीत सुटला आहे, तर तीन सामन्यांचे निकाल लागलेले नाहीत.

इम्रान ताहीरचा इतिहास
सलामीच्या सामन्यात फिरकीपटू इम्रान ताहीरने अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. विश्वचषकाचे पहिले षटक फिरकीपटू इम्रान ताहीरने टाकले. इम्रान ताहीरला पहिले षटक देत डु प्लेसिसने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ताहीरनेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत, पहिल्याच षटकात जॉनी बेअरस्टोला माघारी धाडले. विश्वचषकात पहिले षटक टाकणारा ताहीर हा पहिला फिरकीपटू ठरला आहे. त्याने १० षटकात ६१ धावा देत 2 गडी बाद केले.

इंग्लंड संघ संक्षिप्त धावफलक (कंसात चेंडू)
जेसन रॉय ५४ (५३), जॉनी बेअरस्ट्रो ० (१), जो रूट ५१ (५९), इऑन मॉर्गन ५७ (६०), बेन स्टोक्स ८९ (१६), जॉस बटलर १८ (१६), मोईन आली ३ (९), ख्रिस वोक्स १३ (१४), लियाम प्लंकेट ९ (६), जोफ्रा आर्चर ७ (3) धावा केल्या.

असे होते दोन्ही संघ
दक्षिण आफ्रिका संघ: हाशिम अमला, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, फॅफ ड्यू प्लेसिस, रॅसी व्हॅन डेर डुसेन, जेपी ड्युमिनी, अँडीले फेहलूक्वायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, लुंगी एनगीडी, इम्राना ताहीर

इंग्लंड संघ: जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, इयॉन मॉर्गन ( कर्णधार), जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, आदील रशीद, जोफ्रा आर्चर, लिएम प्लंकेट.