विदेशी एजन्सीद्वारे चंदा कोचर यांची चौकशी

0

मुंबई- वीडियोकॉन घोटाळ्यात अडकलेल्या आईसीआईसीआई बँकेच्या सीईओ चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबा विरोधात चौकशीचे फास आवळण्यात आले आहे. दरम्यान चौकशीची कक्षा अधिक वाढत असून आता अमेरिकी मार्केट रेग्‍युलेटर सीईसीद्वारे कोचर आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी होणार आहे. तर भारतीय चौकशी एजन्सीज परदेशी एजन्सीची मदत घेणार आहे.

चंदा कोचर यांच्यावर हे आहेत आरोप
चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर वीडियोकॉन समूहाला कर्ज वाटप करतांना स्वत:चा फायदा केला आहे. तसेच कर्ज कमी व्याजदरात दिल्याचे आरोप त्यांच्यावर आहे. या व्यतिरिक्त असे आरोप केले जात आहे की वीडियोकॉन समूहाने घेतलेल्या कर्जाची रक्कम चंदा कोचर यांच्या पतीच्या कंपनी असलेली न्‍यूपॉवरच्या खात्यात जमा झाली आहे. आईसीआईसीआई बँकेने वीडियोकॉन समूहाला ३ हजार २५० कोटींचे कर्ज दिले आहे. २०१२ मध्ये हे कर्ज देण्यात आले आहेत. त्यापैकी २ हजार ८१० कोटी परत केले नाही.त्यामुळे बँकेने वीडियोकॉन समूहाला थकीत घोषित केले. त्यानंतर हे प्रकरण बाहेर आले आहे.