मुंबई: सीबीएसई पाठोपाठ आता आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आयसीएसई बोर्डाच्या दहावी परीक्षेत 98.54 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावीचा निकाल 96.52 टक्के इतका लागला आहे. आज दुपारी तीन वाजता आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे निकाल जाहीर झाले. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.