एलओसीजवळ आयईडी स्फोट, एक जवान शहीद

0

श्रीनगर: जम्मू कश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटामध्ये एक जवान शहीद झाला असून सात जवान जखमी झाले आहे. जखमी जवानांना एयर लिफ्टद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. स्फोटानंतर या परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

लोकसभेच्या निकालाला अवघे काही तास बाकी असताना त्या अगोदर झालेल्या स्फोटामुळे चर्चेला उधाण आले आहे. एक्झिट पोलमध्ये मोदी सरकार पुन्हा येणार असल्याचे दाखवण्यात आल्याने पाकिस्तानची डोके दुखी वाढणार आहे. त्यामुळे हा स्फोट घडवून आणल्याचे बोलले जात आहे.