आवश्यक असल्यास कॉंग्रेसला पाठींबा देऊ: अखिलेश यादव

0

नवीदिल्ली: पाहता पाहता देशातील लोकसभा निवडणूक पार पडली. आता सगळ्या देशाचे लक्ष २३ में च्या निकालाकडे लागले असून, दिल्लीच्या गादीवर कोण बसते हे पाहणे महत्वाचे आहे. मतदान चाचण्यामध्ये भाजप प्रणित आघाडीला पूर्ण बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. या येणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्व विरोधी पक्ष नेत्यांची सभा दिल्लीत होणार आहे. त्या सभेसाठी देशातील सगळे विरोधी पक्षाचे नेते हजर राहणार असून, बसपा अध्यक्षा मायावती हजर राहणार नसल्याचे सांगत बसपाने आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवले आहे. तर दुसरीकडे मोदींना सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी, गरज पडल्यास कॉंग्रेसला पाठींबा देण्याचे सुतोवाच समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले आहे.

कर्नाटक प्लॅनच्या धर्तीवर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशातील सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कर्नाटकच्या विधान सभा निवडणुकीवेळी भाजपला सर्वाधिक जागा मिळून भाजप सत्तेपासून दूर राहिला, कारण कॉंग्रसने जेडीएसला समर्थन करत तिथे सत्ता स्थापन केली होती. यासाठी चंद्राबाबू नायडू, कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी हे बसपाच्या अध्यक्षा मायावती यांची भेट दिल्लीत घेणार होते. मायावती दिलीला येणार असल्याचे बोलले जात होते, पण मायावती या बैठकीला जाणार नसल्याचे त्यांच्या पक्षाने जाहीर केले आहे.