राफेलची चौकशी झाली तर मोदी तुरुंगात जातील-राहुल गांधी

0

इंदोर- राफेल विमान खरेदी करारातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. मोदींना केवळ भ्रष्ट म्हटले जात नाही तर ते खरोखरच भ्रष्ट आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारचे किंतु परंतु असता कामा नयेत. राफेल विमान करार हे भ्रष्टाचाराचे खुले प्रकरण आहे, ज्या दिवशी राफेल विमान कराराची चौकशी होईल त्या दिवशी नरेंद्र मोदी सरळ तुरुंगात जातील, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

दरम्यान, राफेल विमान कराराची फ्रान्समध्ये चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. मोदींनी या करारामधून आपले मित्र अनिल अंबानीं यांना फायदा मिळवून देण्यासाठी नियम आणि कायद्यांचा भंग केला आहे असे आरोप राहुल गांधी यांनी केले आहे.