नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. लग्नाचे वय झालेले नसतांना एखाद्यांचे लग्न लावले जात असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करता त्यांचे लग्नाचे वय होत नाही तो पर्यंत त्यांना लिव इन रिलेशनशिप राहत येईल असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. न्यायमूर्ती ए.के.सिकरी आणि अशोक भूषण यांच्या कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यांनी कोर्टात 9 पाणी निर्णय दिला आहे. घरगुती हिंसा अधिनियम, 2005 अनुसार महिलांसंबधी कायद्यान्वये यास स्थान मिळाले आहे.
एप्रिल 2017 मध्ये केरळ राज्यातील त्रिवेंद्रम जिल्यातील एका मंदिरात नंदकुमार आणि तुषारा या दोघांचे लग्न झाले होते. त्यानंतर मुलीच्या वडिलाने कोर्टात याचिका दाखल करून मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदविला. दरम्यान न्यायालयात याबाबत सुनावणी झाली असता तुषारा ही मुलगी 19 वर्षाची असल्याने कायद्यानुसार ती लग्नास पात्र असल्याची दिसून आले मात्र मुलगा नंद कुमार हा २० वर्षाचा असल्याने केरळ न्यायालयाने हे लग्न बेकायदेशीर ठरविले. याविरोधात वर नंद कुमार याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.