कॉंग्रेसने शेतकऱ्यांसाठी काम केले असते तर कर्ज घेण्याची वेळ आली नसती-मोदी

0

पलामू-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड राज्य दौऱ्यावर आहे. पलामू येथे जनसभेला ते संबोधित करीत आहे. यावेळी त्यांनी कॉंग्रेसने त्यांच्याकाळात जर शेतकऱ्यांसाठी काम केले असते, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या असत्या तर आज शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरज पडली नसती असे सांगत कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.

सुरुवातीला कॉंग्रेसने शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी भाग पाडले, त्यानंतर कर्जमाफी करत शेतकऱ्यांसोबत मताचे राजकारण केले असा घणाघाती आरोप त्यांनी केला. कॉंग्रेस शेतकऱ्यांना फक्त ‘वोट-बँक’ समजते असा टोला मोदींनी लगावला.

भाजप सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविल्या, शेतकरी सक्षम व्हावा यासाठी प्रयत्न केले. आम्ही शेतकऱ्यांना अन्नदाता मानतो तर कॉंग्रेस शेतकऱ्यांसोबत मताचे राजकारण केले, हेच त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे असा आरोप मोदींनी केला.