वरणगाव | आमच्या परिवारातील एकही सदस्य ठेकेदार निघाल्यास राजकीय सन्यास घेवू, असे आमदार संजय सावकारे यांचे बंधू प्रमोद सावकारे यांनी सांगितले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या टिकेला उत्तर देताना ते बोलत होते. माजी मंत्री खडसे यांच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी केल्यास त्यातून सत्यता बाहेर येईल असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी फुलगांव येथील उपोषणस्थळी भेट दिलीण. त्यावेळी मतदार संघाचे आमदार आता ठेकेदार झाले असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.