नवी दिल्ली- अनेकदा नियोजित वेळेवर रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोहोचत नाही. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. याचा प्रवाशांना प्रचंड वैताग सहन करावा लागतो. मात्र यावर आता तोडगा निघणार असून तांत्रिक अडचण नसतांना रेल्वे नियोजित वेळे प्रमाणे जर रेल्वे स्थानकांवर पोहीचली नाही तर संबंधित जबाबदार असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्रमोशन रोखण्यात येईल असा इशारा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिला आहे. रेल्वे मंत्र्यांनी वेळेवर रेल्वे चालविण्याबाबत एका महिन्याचे अल्टीमेटम दिले आहे, त्यानंतर सुधार झाला नाही टर प्रमोशन रोखण्याची कारवाई केली जाणार आहे.