ग्रामस्थांचा विरोध असेल तर वारसुत प्रकल्प नको, अन्यथा महाराष्ट्र पेटवू!
उध्दव ठाकरेंचा महाडच्या सभेत इशारा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल
महाड |
दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी बाशिंदे-फडणवीसांवर जोरदार निशाणा साचला आहे. चारसू येथील रिफायनरीला ग्रामस्थांचा विरोध असेल, तर येथे प्रकल्प उभारू नका. हुकुमशाही लादू नका. अन्यथा महाराष्ट्र पेटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. यानंतर आता महाडच्या समेत उद्भव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
बारसू दौन्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी शिंदे- फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. वारसू येथील रिफायनरीला ग्रामस्थांचा विरोध असेल, तर येथे प्रकल्प उभारू नका. हुकूमशाही लादू नका. अन्यथा महाराष्ट्र पेटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. यानंतर आता महाडच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपा मेहबुबा मुफ्तींसोबत गेले तेव्हा त्यांनी काय सोडले होते. मोहन भागवत मशीदीत गेले तेव्हा त्यांनी काय सोडले होते, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला आहे.. महाडमध्ये भगवा फडकला पाहिजेच पण भगव्याचे महत्त्व समजून घ्या. लालूप्रसाद यांची सून बेशुद्ध पडेपर्यंत त्यांनी चौकशी केली. हे त्यांचे हिंदुत्व आहे काय निवडणुकीनंतर या भ्रष्ट सरकारसोबत भाजपा सत्तेत बसली आहे. देशातील सर्वात भ्रष्ट सरकार मेघालयात आहे, असे अमित शहा म्हणाले होते.
भाजप म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी असे नाव त्यांनी करावे. भी हिंदुत्व सोडले असा आरोप करता, पण एकदा हिंदुत्व म्हणजे काय ते समजून घ्या, भाजपचे हिंदुत्व म्हणजे गोमूत्रधारी आहे. आपली सभा झाल्यावर आपल्या सभेच्या ठिकाणी येत ते गोमूत्र शिंपडतात बारसूमधले सर्वजण माझे नातेवाईक आहेत. त्यांच्यासाठी मी लढतोय माझ्याकडचे सगळे काढून घेतले, तरीही आता तुम्हाला माझी भीती का वाटते असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहनी प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहे, असे मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहेत. असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे केली. काँग्रेस तुम्हाला शिव्या देते, त्या तुम्ही मोजता. पण जे त्यांचे टिनपाट आहेत, ते जी टीका करतात, त्यांचे काय करायचे सत्यपाल मलीक यांच्या चौकशीसाठी सीबीआय जाऊन आली. कदाचित त्यांनाही आत टाकतील.
प्रश्न विचारायचं नाही. आपल्या देशातील सैनिकांचा उपयोग भाजप प्रचारासाठी करत आहे. द्वेषाचे राजकारण करायचे. हिंदू-मुसलमान यासारखे मुद्दे मॉडल निवडणुकांमध्ये उतरत आहेत तुमचे सोन्यासारखे मत त्यांना देतात, मात्र तुमची फसवणूक होत आहे. तसेच कोणी प्रश्न विचारल्यावर त्यांना देशद्रोही ठरवत तुरुंगात टाकायचे, भाजपचे काम सुरू आहे. मतदान करताना बजरंगबली की जय म्हणत मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान करत आहे. हा धार्मिक प्रचार नाही काय भाजपने २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांपैकी किती पूर्ण झाली आहेत. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसेना संपवायला आला आहात, समचे काय करायचे ते सांगा. माझ्यावर टीका केल्याने कुप्पाला जर दोन घास मिळत असेल तर हे थोडके नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राणे कुटुंबियांवर टीकास्त्र डागले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई पुन्हा बरळले आहेत. महाराष्ट्र मग येथील गावकन्यांना घरे का मिळाली नाही. मदार सतेवर आल्यावर हे काम थांबले. अनेक घरांचे कामही सुरू करण्यात आलेले नाही. तळये गावात दरड कोसळली होती. या गावच्या पुनर्वसनासाठी आपण काम केले होते. ते खोले घऊन मोकळे झाले आहे. मात्र, कोकणच्या निसर्गाची हानी का करत आहात. प्रकल्प आणायचा असेल तर जनतेला का विश्वासात घेतले जात नाही. जुलूम, दडपशाही सुरू आहे. पत्रकारांना रोखण्यात येत आहे. तेथील स्थानिकाच्या मुंजुरीशिवाय आपण हा प्रकल्प होऊ देणार नाही. भरत गोगावले यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला का ? जगताप कुटुंबियांचा पक्ष प्रवेश तें खोके घऊन मोकळे झाले आहे.