जळगाव – ग्रामीण भागातील युवकांना जर अभिनय करायची इच्छा असेल त्यांनी लवकरात लवकर मुंबई घातली पाहिजे कारण फिल्म इंडस्ट्री ची मुख्य बाजारपेठ ही मुंबईच आहे आणि स्वतःची कला जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी असं या युवकांना वाटत असेल त्यांना मुंबई शिवाय इतर कोणताही पर्याय नाहीये. असे प्रतिपादन अभिनेते सोमण यांनी बेंडाळे महाविद्यालयात सुरू असलेल्या देवगिरी फिल्म फेस्टिवल येथे पत्रकारांशी बोलताना केले.
या पुढे ते असेही म्हणाले की मुंबईत गेलो आणि मला संधी मिळाली असं होणार नाही त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. मित्रांना काम मिळत आहे आणि मला सहा सहा महिने काम भेटत नाहीये अशी परिस्थिती देखील युवकांसमोर येते. अशावेळेस खचून न जाता व व्यसनाच्या आहारी न जाता जास्तीत जास्त संयम ठेवत येणारी संधी हुकणार नाही याची काळजी घेत काम करणे अत्यंत गरजेचे असते असे यावेळी सोमण म्हणाले.
यूट्यूब ही खूप मोठी संधी
आजच्या तरुण वर्गाकडे स्वतःची कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर युट्यूब एक खूप चांगलं साधन किंबहूना संधी आहे. माणूस चुका करत करत शिकतो आणि युट्युब सारखा माध्यम युवा पिढीला चुका करण्याची खूप मोठी संधी देतो. स्वतः सुधारणा करणं हेदेखील या युवा पिढीचे काम आहे. समजा आमच्या काळात यूट्यूब सारख व्यासपीठ का नव्हतं असा प्रश्न मला कधी कधी पडतो या वेळी सोमण म्हणाले
समाजावर परिणाम होत नाही
गेल्या कित्येक दिवसापासून मी असा ऐकतोय की, युवक वेबसिरीज बघून खून करायला लागले आहेत. मात्र माझा यावर विश्वास नाही. चित्रपट हे समाजाचं प्रतीक असतं समाज नाही. जर आपण टक्केवारि बघायला गेलो तर एखादी वेबसिरीज हजारो लोक बघतात मात्र बोटावर मोजण्या एवढीच लोक त्याच्यातून प्रेरणा घेत काही वाईट कृत्य करतात.
यापुढे जाऊन सिने पटकथाकार लाबा म्हणाले की, भारतीय लोकांना विदेशात काय घडतं या गोष्टीचे प्रचंड आकर्षण आहे. मात्र त्यांनी आपल्या मुळात काय आहे ते पाहणं प्रचंड गरजेचं आहे. आपल्या भारताचे मूळ इतके खोलवर रुतले आहे की याबाबतच फक्त चित्रपट करायचे ठरवले तर कित्येक वर्षे निघून जातील पण चित्रपटांसाठी कथांची कमी होणार नाही.