आयजी इंटरनॅशनलद्वारे स्टेमिल्टची पिनाटा सफरचंदे भारतात सादर
मुंबई : आयजी इंटरनॅशनल, या भारतातील सर्वात मोठ्या फळांच्या आयातदार कंपनीतर्फे लोकप्रिय पिनाटा सफरचंदे भारतात सादर करण्यात आली आहेत. दक्षिण अमेरिकेच्या पिपफ्रूट सप्लायर स्टेमिल्ट ग्रोवर्सबरोबर भागीदारीत हे उत्पादन सादर करण्यात आले. बॉलिवुड अभिनेत्री यामी गौतम हिने आयजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेचे संचालक तरुण अरोरा, स्टेमिल्ट ग्रोवर्सचे उपाध्यक्ष माइक टेलर आणि निर्यात संचालक बिल यंग यांच्या उपस्थितीत खास उष्णकटिबंधातील सफरचंदाचे अनावरण केले.
आयजी इंटरनॅशनल आणि स्टेमिल्ट ग्रोवर्सच्या भागीदारीला यशस्वी दहा वर्षे पूर्ण झाली असून आपल्या देशातील सेंद्रीय उत्पादनांची वाढती मागणी उद्योगक्षेत्रातील या आघाडीच्या कंपन्या पूर्ण करत असल्याची व त्यासाठी करण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्याची ही पोचपावतीच आहे. स्टेमिल्ट ग्रोवर्स कुठलीही खते न वापरता उच्च दर्जाच्या फळांचे उत्पादन करते आणि त्यासाठी ती वचनबद्ध आहे हे सर्वांनाच ज्ञात आहे. खास करून पिनाटा वेगळ्या व अपवादात्मक चवीचे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे. पिनाटा करकरीत, रसाळ आणि आंबटगोड चवीचे सफरचंद आहे. त्याचा अनेक पाककृतींमध्ये उपयोग केला जातो. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात स्टेमिल्टच्या वॉशिंग्टन स्टेट ऑर्चर्डमध्ये याची कापणी होते आणि या फळाला जागतिक स्तरावरून विशेष मागणी आहे. लाल व केशरी रंगातील हे सफरचंद प्रत्येक वर्षी नोव्हेंबर ते मे या कालावधीत उपलब्ध होते.