IIM प्रवेशासाठी CAT परीक्षा 26 नोव्हेंबरला

0

लखनौ: देशातील सर्वात मोठी एमबीए प्रवेश परीक्षा कॉमन एप्टिट्यूड टेस्ट 2017 (कॅट) 26 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. ही माहिती लखनौच्या इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने एका सूचनेद्वारे दिली आहे.

कॅट दोन सत्रांमध्ये होणार आहे आणि कॅट 2017 साठी नोंदणी 9 ऑगस्टपासून सुरू होऊन 20 सप्टेंबरपर्यंत खुली असणार आहे. आयआयएम लखनौ ही परीक्षा आयोजित करणार आहे. परीक्षेचे संयोजक नीरज द्विवेदी यांनी सांगितले की ही परीक्षा 180 मिनिटांची असेल. त्यात मिळणाऱ्या गुणांनुसार देशातील 20 आयआयएम आणि 100 बिझनेस स्कूल मध्ये प्रवेश मिळतो. आयआयएम मध्ये जवळ जवळ 4 हजार जागा आहेत.

अधिक माहितीसाठी संस्थेची वेबसाईट- https://iimcat.ac.in/

महत्वाच्या तारखा
19 ऑगस्ट – कॅट 2017 रजिस्ट्रेशन सुरू
20 सप्टेंबर – रजिस्ट्रेशन बंद
18 ऑक्टोबर – परीक्षार्थींना प्रवेश पत्र जारी केले जाईल. परीक्षा दिनांकापर्यंत ते डाउनलोड करता येणार.
26 नोव्हेंबर – कॅट 2017 परीक्षा