नदीतून अवैध वाळू उपसा एकास सुनावली वन कोठडी

नंदुरबार नवापूर तालुक्यातील प्रतापपूर कक्ष क्र.६७ मध्ये तपासणी केली असता रंगावली नदी पात्रात अवैध वाळू उपसा करतांना अज्ञात ट्रॅक्टर आढळून आले. वनविभागाच्या पथकाने त्यांचा पाठलाग केला. मात्र, वाहनासह संशयित पसार झाले. त्या क्षेत्राची तपासणी केल्यावर एक संशयित आढळून आल्याने त्यास अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केल्यावर त्याला एका दिवसाची वन कोठडी देण्यात आली आहे.

वन विभागाच्या पथकाने नियत क्षेत्र प्रतापपूर कक्ष क्रमांक ६७ यात जाऊन तपासणी केली होती. रंगावली नदी पात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूक करताना अज्ञात वाहन ट्रॅक्टर आढळून आले. त्याचा पाठलाग केल्यावर ते पसार झाले. त्या क्षेत्रात तपासणी केल्यावर संशयित प्रवीण रमेश कुवर मिळून आला. त्यास अटक करून नवापूर न्यायालयात हजर केले होते. त्याला एका दिवसाची वन कोठडी मिळाली.

कारवाईत वन संरक्षक धुळे व विभागीय वनाधिकारी धुळे, उपवन संरक्षक नंदुरबार सहाय्यक वन संरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली व वनक्षेत्रपाल नवापूर यांच्या नेतृत्वाखाली वनपाल बोरझर ए. एम. शेख पुढील तपास करीत आहेत. कारवाईत वनपाल कामोद संजय बडगुजर, वनरक्षक अमोल गावित, वसंत कोकणी, अजय भोये, कमलेश वसावे, कल्पेश अहिरे यांनी सहभाग नोंदविला.