फैजपुरातील अवैध लक्झरी थांब्यामुळे अपघातास निमंत्रण: कारवाईची मागणी

फैजपूर प्रतिनिधी ।

येथील गेल्या वर्षभरापासून छत्री चौकाजवळ मोठ्या प्रमाणावर लक्झरी बसेस थांबत असल्यामुळे आणि तेथेच बुकिंग होत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघाताला निमंत्रण असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्वरित कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

येथील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर भर रस्त्यावर लक्झरी बसेस येथून इंदूरहून येणाऱ्या पुणे, मुंबई, नाशिक, सुरत, अहमदाबाद आधी ठिकाणी येथूनच रवाना होतात. त्यामुळे छत्री चौकापासून सुभाष चौकापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेक तक्रारी असूनही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. छत्री चौकापासून तर सुभाष चौकापर्यंत वाहतुकीस अडथळा निर्माण होणाऱ्या लक्झरी बसेस थांबत असल्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात झालेले आहे. तरीसुद्धा याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष का करीत आहे. याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असून अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्ग असल्याने दररोज या ठिकाणाहून हजारो लहान, मोठी वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे दररोज अपघाताला आमंत्रण असल्याचे दिसत असून या वर्षाची परंपरा लोकशक्ती छत्री चौक ठिकाणी दररोज दुपारी ४ वाजेपासून तर रात्रीच्या ८ वाजेपर्यंत लक्झरी बसेस थांबतात आणि तिथूनच बुकिंग होऊन या ठिकाणी दररोज लक्झरी बसमध्ये बसणाऱ्या उतरणाऱ्या प्रवाशांची झुंबर होत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब याकडे लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.