सावद्यातील विमल गुटक्याची अवैध विक्री सुरच पोलिसांपुढे आवाहन

फैजपुर प्रतिनिधी 

येथील सावदा तालुका रावेर येथील सरदार वल्लभ भाई पटेल कॉम्पलेक्स समोर येथे अनेक दिवसापासून गाजत असलेल्या विमल गुटका किंग वर अद्याप कारवाई का होत नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून त्यामुळे पोलिसांपुढे हे मोठे आवाहन असून वरिष्ठ पातळीवरून कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे

याबाबत वृत्त असे की महाराष्ट्र राज्य शासनाकडून बंदी घातलेल्या विमल गुटखा हा सावदा तालुका रावेर येथे सरदार वल्लभभाई पटेल कॉम्प्लेक्स समोर मोठ्या मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या ब्रहानपूर येथून दररोज लाखो रुपयांचा विमल गुटखा अवैद्यरित्या आणून किराणा दुकानाच्या नावाखाली खुलेआम अवैद्य विक्री केली जात आहे सावदा सह परिसरात वाघोदा निंभोरा रोझदा चिनावल अशा अनेक परिसरातील गावांमध्ये येथूनच दररोज लाखो रुपयांच्या विमल गुटख्याची खुलेआम विक्री केली जात असून सरदार वल्लभभाई पटेल कॉम्प्लेक्स समोर गजबजलेल्या चौक परिसरात किराणा दुकानाच्या नावाखाली विमल गुटखा घेणाऱ्यांची अक्षरशः या ठिकाणी एकच गर्दी उसळते त्यामुळे वाहतुकीला सुद्धा या ठिकाणी अडथळा होत असून हे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे आहे सध्या जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे पथक तयार असून अनेक ठिकाणी विमल गुटख्यावर छापेमारी सुरू आहे परंतु सावद्यातील या सरदार वल्लभभाई पटेल शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर गजबजलेल्या ठिकाणी कारवाईला विलंब का होत आहे असा प्रश्न उपस्थित होत असून या विमल गुटख्याच्या सेवनामुळे अनेकांना कर्करोगाची लागण होत असल्याची भीती असल्याने महाराष्ट्र राज्यात बंदी घातलेली असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर विमल गुटख्याची विक्री होत असून हे पोलिसांनी पुढे मोठे आवाहन आहे येथील गुटखा किंगवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि हा अवैध विमल गुटक्यावर कायमचा बीमोड व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे