न्हावी प्रतिनिधी l बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरून येत असताना हंबर्डी ते हिंगोणा दरम्यान हिंगोणा गावाकडे येताना आज मंगळवार दि. 30 मे 2023 रोजी दुपारी 15:40 वाजेच्या दरम्यान 3 चाकी प्रवासी अपेरिक्षा चालकाने रिक्षाच्या दोन्ही बाजूने वीस फुटी प्लास्टिकचे पाईप बांधून बेकायदा वाहतूक केली यामुळे इतर वाहन चालकांना मात्र मोठा अडथळा निर्माण झाला.ट्राफिक पोलीस आणि आरटीओ नेहमी मालवाहतूक व प्रवासी वाहतू वाहनधारकांशी पद्धतशीरपणे समन्वय साधत असल्याने या अवैध मालवाहतूक वाहनधारकांची, आणि अवैध प्रवासी वाहनधारकांची हिंमत वाढली असून त्यांच्यावर पोलीस आणि आरटीओ कारवाई करीत नसल्याने मात्र इतर वाहनधारकांचा जीव धोक्यात येत असतो त्याचे हे बोलके चित्र आणि आरटीओ आणि ट्राफिक पोलिसांसाठी कारवाई करण्यासाठी पुरावा समोर आला आहे.