बुलंदशहर: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील इच्चावारी गावात स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या स्वच्छता गृहाच्या भिंतीवर चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभाचे छायाचित्र असलेले टाईल्स लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही अतिशय निंदनीय बाब असून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. एएनआयने याबाबत छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.